२८ जुलैला सुरु झालेला बिग बॉस मराठी 5 आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपला आहे. पहिल्या दिवसापासूनच बिग बॉस मराठी 5 चा प्रेक्षकवर्ग मोठ्या संख्येने पाहायला मिळाला होता. बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसापासूनच सदस्याामध्ये खटके उडू लागले. अनेक सदस्यांनी आतापर्यंत बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला आहे. त्यामध्ये काही सदस्य प्रक्षकांच्या आवडीचे देखील ठरले होते. तर बिग बॉस मराठीच्या इतिहासात असं पहिल्यांदा असं झालं असेल ज्यात 100 दिवसांचा बिग बॉस आता 100 दिवसांचा बिग बॉस आता 70 दिवसांमध्ये पार पडणार आहे.
हा निर्णय बिग बॉस मराठी पर्व 5 मध्ये खुद्द बिग बॉसने सर्व सदस्यांसमोर सांगितला आहे. अनेक प्रेक्षक बिग बॉसच्या या निर्णयाला सहमत नसल्याचं पाहायला मिळत आहे तर बिग बॉसच्या या निर्णयाने अनेक कलाकार तसेच आधीच्या काही पर्वातील बिग बॉसचे जुने सदस्य यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. ज्यावेळेस बिग बॉसने हा निर्णय घरातील सदस्यांना सांगितला त्यावेळेस घरातील सर्व सदस्य आश्चर्यचकीत झालेले पाहायला मिळाले. तर आता 100 दिवसांचा बिग बॉसचा खेळ हा 70 दिवसांचा होणार आहे. तर येत्या 14 दिवसांत बिग बॉसचा ग्रँड फिनाले पार पडणार असून 6 ऑक्टोबरला बिग बॉस मराठी 5 चा ग्रँड फिनाले पार पडणार आहे.
सगळेच खेळाडू झाले नॉमिनेट:
अरबाज घरातून निघून गेल्यानंतर उरलेल्या स्पर्धकांमध्ये एक टास्क झाला. ज्यामध्ये सदस्यांना एकामेकाला टार्गेट करायचं होतं ज्यात सर्व स्पर्कांकडून निक्कीला टार्गेट करण्यात आलं. आता नॉमिनेशनमध्ये घरातील सर्वच सदस्य फसलेले पाहायला मिळाले ज्यात आता पंढरीनाथ कांबळे, धनंजय पोवार, अभिजीत सावंत, वर्षा उसगांवकर, निक्की तांबोळी, सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर हे सदस्य आहेत. आता 14 दिवसांच्या खेळात कोणता खेळाडू बाजी मारणार आणि कोणते खेळाडू ऐन टप्प्यावर माघार घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.